हाय लाईट बातमी

आता आमची शाळा झाली आहे सेमी इंग्रजी माध्यमाची शाळा. तर लवकरच पहिली ते चौथीसाठी आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.प्रवेशासाठी ONLINE लिंक भरा... गुणवत्ता, गुणवत्ता, ....ध्यास अमुचा गुणवत्ता..

२१/०२/२०२०

छत्रपती शिवाजी महाराज जयंती

दि.19/02/2020 रोजी शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साकोरे मिग येथे शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित लोकगीते सादर केली. तसेच एक कृतीयुक्त नाट्यगीत पोवाडा सादर करण्यात आला. लहान लहान मुलांनी शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित भाषणे केलीत आणि यानंतर शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित मनोगत व्यक्त करण्यात आली.