माझ्या शाळेची एक झलक
https://drive.google.com/file/d/0B2l99DumJV5yRmtRbjhQd3FzTU0/view?usp=docslist_api
किंवा येथे क्लिक करा .
माझ्या शाळेची एक झलक
https://drive.google.com/file/d/0B2l99DumJV5yRmtRbjhQd3FzTU0/view?usp=docslist_api
किंवा येथे क्लिक करा .
म्हणी संग्रह
1. पी हळद हो गोरी – उतावळेपणा दाखविणे
2. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही – प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही
3. बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर – दोनपैकी एक पर्याय निवडणे
4. चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे – प्रत्येकाची वेळ कधीतरी येतेच
5. आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे – अपेक्षेपेक्षा जास्त प्राप्ती होणे
6. उंटावरचा शहाणा – मूर्ख सल्ला देणारा
7. अडला हरी गाढवाचे पाय धरी – अडचणीच्या वेळी मूर्खाचीही मनधरणी करावी लागते
8. नाचता येईना अंगण वाकडे – स्वत:स चांगले काम येत नसणारा दुसऱ्याचे दोष काढतो
9. तोंड दाबून बुक्क्यांचा मार – विनाकारण जुलूम सहन करावा लागणे
10. नावडतीचे मीठ अळणी – नावडत्याने काही चांगले केले तरी आवडत नाही
11. अंथरूण पाहून पाय पसरावे – ऎपत पाहून खर्च करवा
12. छत्तीसाचा आकडा – विरुद्ध मत असणे
13. तेरड्याचा रंग तीन दिवस – एखादे कार्य थोडे दिवस जोरात चालून एकदम बंद पडणे
14. दुष्काळात तेरावा महिना – संकटात अधिक भर
15. नव्याचे नऊ दिवस – नवेपणा असतानाचे कौतुक नंतर टिकत नही
16. एका हाताने टाळी वाजत नाही – दोष दोन्हीकडे असतो
17. पालथ्या घड्यावर पाणी – सर्व प्रयत्न निरुपयोगी ठरणे
18. वासरात लंगडी गाय शहाणी – अडाणी लोकात अल्प ज्ञान असणारा शहाणा ठरतो
19. रात्र थोडी सोंगे फार – काम भरपूर, वेळ कमी
22. अति शहाणा त्याचा बैल रिकामा – अति शहाणपणाने नुकसान होते
21. शेरास सव्वाशेर – प्रतिपक्षापेक्षा श्रेष्ठ
22. नाकाचा बाल – अत्यंत प्रिय व्यक्ती
23. नाकापेक्षा मोती जड होणे – डोईजड होणे
24. आई जेवू घालीना बाप भीक मागू देईना – दोन्ही बाजूंनी अडचण
25. कामापुरता मामा – काम साधण्यापुरते गोड बोलणे
26. आधी पोटोबा मग विठोबा – अगोदर पोट भरावे मग देवास आळवावे
27. काखेत कळसा गावाला वळसा – वस्तू स्वत:पाशी असून शोधत राहणे
28. झाकली मूठ सव्वा लाखाची – दुर्गुण असले तरी प्रकट करू नयेत
29. पायीची वहाण पायी बरी – योग्यतेप्रमाणे वागवावे
30. मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये – एखाद्याच्या चांगुलपणाचा फार फायदा घेऊ नये
31. उंटावरून शेळ्या हाकणे – आळस, हलगर्जीपणा करणे
32. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही – क्षुद्र माणसांच्या निंदेने थोरांचे नुकसान होत नाही
33. कोल्हा काकडीला राजी – लहान माणसे थोड्या गोष्टीने संतुष्ट होतात
34. गाढवाला गुळाची चव काय – अडाणी, मूर्ख माणसास गुणाचे कौतुक नसते
35. घोडामैदानजवळ असणे – परीक्षा लवकरच होणे
36. डोंगर पोखरून उंदीर कढणे – जास्त श्रम करून कमी फायदा होणे
37. भरंवशाच्या म्हशीला टोणगा – पूर्ण निराशा करणे
38. वरातीमागून घोडे – एखदी गोष्ट झाल्यावर तिची साधने जुळवणे
39. पाण्यात राहून माशाशी वॆर – बलवानाशी शत्रुत्व काय कामाचे ?
40. खायला काळ भुईला भार – ज्याचा काही उपयोग नाही असा माणूस भार बनतो
41. तेल गेले, तूप गेले, हाती धुपाटणे आले – दोन्ही फायदा करून देणाऱ्या गोष्टी मूर्खपणामुळे हातच्या जाणे
42. नाव मोठे लक्षण खोटे – कीर्ती मोठी पण कृती छोटी
43. हपापाचा माल गपापा – लोकांचा तळतळाट करून मिळवलेले धन झपाट्याने नष्ट होते
आमचे तंत्रस्नेही मित्र श्रीकृष्ण निहाळ सर यांच्या www.Primaryteachers.in वर खुप मोठा शैक्षणिक व्हिडीओ खजिना उपलब्ध आहे.
या साठी येथे क्लिक करा.
एक कहानी
*एके रात्री रात्री राजा कृष्णदेवराय याला स्वप्न पडले. त्या स्वप्नामध्ये त्याने एक सुंदर महाल पाहिला. तो महाल खूप सुंदर होता, महाल अधांतरी तरंगत होता. महालाला सुंदर सुंदर दालने होती, दालनात रंगीबेरंगी रत्ने लावली होती. महालात विशेष प्रकाशयोजना केलेली नव्हती जेव्हा मनाला वाटेल तेव्हा आपोआप प्रकाश पडत असे व जेव्हा प्रकाश नको वाटे तेव्हा अंधार होत असे. सुखसंपन्नतेने सजलेला तो महाल म्हणजे एक आश्चर्य होते. पृथ्वीवरच्या कोणत्याही माणसाला भुरळ पाडेल अशाच प्रकारची त्या महालाची रचना होती. हे स्वप्नात राजाने पाहिले आणि जागा होताच त्याने आपल्या राज्यात दवंडी पिटवली की, जो कोणी मला अशा वर्णनाचा महाल बनवून देईल त्याला एक लाख सुवर्णमुद्रा बक्षीस देण्यात येतील. सर्व राज्यात राजाच्या या स्वप्नाची चर्चा होऊ लागली. जो तो हेच म्हणू लागला की अशा प्रकारचा महाल फक्त स्वप्नात बनू शकतो. राजाला बहुधा हे कळत नसावे अशाच आशयाची चर्चा सर्वत्र होऊ लागली. राजाने आपल्या राज्यातील सर्व कारागिरांना बोलावले त्यांना सूचना दिल्या. अंगात विविध कौशल्ये असणारे कुशल कारागिर राजाला समजावू लागले,’’महाराज, अशा प्रकारचा महाल कधीच बनू शकत नाही. तुम्ही याचा नाद सोडून द्या’’ पण राजाच्या डोक्यात आता तो महाल बांधण्याचे ठरलेच होते. काही स्वार्थी लोकांनी मात्र याचा चांगलाच लाभ करून घेतला. त्यांनी महाल बांधण्यासाठी राजाकडून पैसे घेतले. राजाने महाल बांधून देण्याचे आश्वासन देऊन ती माणसे गायब झाली होती. मात्र मंत्री लोकांना याचे वाईट वाटत होते की राजाला माणसे फसवित आहेत. कोणीही मंत्री राजाला समजावून सांगायला पुढे जात नव्हता. यातून फक्त एकच माणूस राजाला समजावू शकत होता तो म्हणजे तेनालीराम आणि तो काही दिवसांसाठी बाहेरगावी गेला होता. एक दिवस राजाचा दरबार सुरु झाला आणि एक म्हातारा माणूस रडत, मोठ्याने ओरडत दरबारात आला. राजाने त्याला न रडण्याची विनंती केली व म्हणाला,’’ वृद्धबुवा काय झाले, चिंता करू नका, मी काही तुमची मदत करू का. तुम्हाला न्याय मिळेल याची तुम्ही ,खात्री बाळगा.’’ म्हातारा रडायचे थांबवून राजाला म्हणाला,’’महाराज, मला सर्वानी लुटले, माझ्या जीवनभराची कमाई कुणीतरी चोरी केली. महाराज, मला छोटी छोटी मुले आहेत आता तुम्हीच सांगा की मी त्यांना कसे जगवू.’’ राजाला हे ऐकून खूप राग आला व संतापाने राजा म्हणाला,’’ मला सांगा, कोणी तुम्हाला छळले, कोणी तुमची संपत्ती हडप केली. माझा कोणी कर्मचारी तुम्हाला जर त्रास देत असेल तर सांगा.’’ म्हातारा म्हणाला,’’ नाही महाराज तुमचा कोणीही कर्मचारी मला त्रास देत नाहीये’’ राजा म्हणाला,’’ मग तुमची संपत्ती कुणी हडप केली अशी तुमची तक्रार आहे’’ म्हातारा म्हणाला,’’ महाराज, क्षमा असावी पण काल रात्री मला एक स्वप्न पडले, त्या स्वप्नात तुम्ही स्वत:, तुमचे मंत्री आणि दरबारातले सर्व कर्मचारी सगळे मिळून माझ्या घरी आलात आणि माझ्या घरातील तिजोरी तुम्ही सर्वानी मिळून उचलली आणि ती तुम्ही तुमच्या राजखजिन्यात जमा करून घेतली.’’ राजा अजूनच संतापला व म्हणाला,’’ मूर्खासारखे बोलू नको, अरे सत्यात तर काय मी स्वप्नातसुद्धा असा अत्याचार करणार नाही आणि मूर्ख माणसा स्वप्ने कधी सत्य होतात काय याची तुला जाणीव आहे की नाही.’’ हे वाक्य संपताक्षणी त्या म्हाता-याने आपली नकली दाढी व फेटा काढून टाकला व आपल्या मूळ अवतारात हजर झाला. तो तेनालीराम होता. तेनालीराम म्हणाला,’’ महाराज अशक्य स्वप्ने सत्यात येऊ शकत नाहीत हेच मला तुम्हाला सांगायचे होते. माणसाने स्वप्ने सत्यात आणण्याचा प्रयत्न करावा हे योग्य आहे पण अशक्य असणा-या स्वप्नांच्या मागे कधीच पळू नये असे मला वाटते.’’ राजाला आपली चूक कळून आली. त्याने तेनालीरामला चांगला सल्ला दिल्याबद्दल बक्षीस दिले.*